बाज |आरोग्य उपकेंद्र (बाज) इमारत बांधकामाचे उदघाट्न

बाज | आज दि . १५ ऑक्टोबर २००४ रोजी आरोग्य उपकेंद्र (बाज) इमारत बांधकामाचे उदघाट्न हे माजी सभापती मा. आकाराम (दादा ) मासाळ, लोकनियुक्त मा. सरपंच श्री राज गडदे , मा. उपसरपंच श्री गणपती ऐवळे आणि गावातील सर्व प्रतिष्टीत नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले.

बाज आरोग्य उपकेंद्र – उदघाटन

आपल्या बाज गावातील जुने आरोग्य उपकेंद्र गेल्या ८ ते १० वर्षापासून बंद असून इमारत पूर्णपणे पडलेली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांची खूप गैरसोय होत होती/आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून आम्ही (मी, मा. आकाराम दादा मासाळ, आणि आप्पा मासाळ) मा. आमदार गोपीचंद पडळकर साहेब याना भेटून, त्यांचे शिफारस पत्र घेऊन सातत्याने जिल्हा वैद्यकीय अधिकारी व सीईओ जिल्हा परिषद सांगली यांचेकडे पाठपुरावा केला आणि आज अखेर या प्रयत्नास यश आले आणि आपल्या गावात आरोग्य उपकेंद्र इमारत बांधकामासाठी रू. ९८,८९,७३४/ इतका निधी मंजूर झाला आणि आज या कामाचा भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

ह्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळवण्यासाठी मा. आमदार श्री गोपीचंद पडळकर साहेब व माजी समाजकल्याण सभापती मा. आकाराम दादा मासाळ यांनी विशेष प्रयत्न व सहकार्य केलेबद्दल त्यांचे बाज ग्रामपंचायत , सर्व ग्रा.प. सदस्य व सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचे जाहीर आभार*.

मा. सरपंच श्री. राज गडदे.

#rajadade#SarpanchSaheb#sarpanchbaj