आज बाज ते बागेवाडी रस्ता (पाटील मळा, कमात वस्ती मार्गे) या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या मुर्मिकरण कामाचे उद्घाटन यशस्वीपणे पार पडले. या रस्त्यामुळे पाटील मळा व कमात वस्ती परिसरातील ग्रामस्थांना दळणवळणासाठी मोठा दिलासा मिळणार असून शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुलभता निर्माण होणार आहे.

हे काम आमदार निधीतून
मा. आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी मंजूर केल्याबद्दल
तसेच या कामासाठी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल
मा. माजी सभापती आकाराम मासाळ साहेब
आणि
चेअरमन भाऊसाहेब दुधाळ साहेब
यांचे बाज ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांच्या वतीने मनःपूर्वक आभार.

या उद्घाटन सोहळ्यास उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व विद्यमान व माजी सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग व एकजूट हीच बाज गावाच्या विकासाची खरी ताकद आहे.
सरपंच या नात्याने माझा ठाम विश्वास आहे की, दर्जेदार रस्ते व मूलभूत सुविधा या गावाच्या प्रगतीचा पाया आहेत. भविष्यातही बाज गावातील प्रत्येक वाडी-वस्तीपर्यंत विकासकामे पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्नशील राहील.
विकासाच्या दिशेने आज आणखी एक ठोस पाऊल!
आपल्या सर्वांच्या सहकार्याने स्वच्छ, सशक्त व समृद्ध बाज घडवूया.
—
सरपंच राज गडदे
बाज ग्रामपंचायत #sarpanch #rajgadade #bajgrampanchayat








