क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

बाज | मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बाज गावात विविध ठिकाणी अत्यंत सन्मानपूर्वक व प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

बाज ग्रामपंचायत, Z.P. School Baj तसेच New English School Baj येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भाषणे, विचारमंथन व विविध उपक्रमांतून सावित्रीबाईंच्या शिक्षणक्रांतीचे महत्त्व अधोरेखित केले.

स्त्री शिक्षण, समानता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनासाठी सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन शिक्षण, मूल्यसंस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या कार्यक्रमांतून देण्यात आला.

या प्रसंगी ग्रामपंचायत प्रतिनिधी, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🙏 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

सरपंच राज गडदे — बाज ग्रामपंचायत #bajgrampanchayat#सरपंच#rajgadade