मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातर्गत मार्गदर्शन व आढावा – गटविकास अधिकारी यांची बाज ग्रामपंचायत ला भेट

बाज | मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातर्गत मार्गदर्शन व आढावा घेणेसाठी पंचायत समिती जत चे सहायक गटविकास अधिकारी श्री ज्ञानेश्वर गुरव साहेब यांनी बाज ग्रामपंचायत ला भेट

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे गावाच्या सर्वांगीण विकासासाठीची एक प्रभावी चळवळ आहे. 💪🌱

या अभियानांतर्गत मार्गदर्शन व आढावा घेण्यासाठी पंचायत समिती जत येथील सहायक गटविकास अधिकारी श्री. ज्ञानेश्वर गुरव साहेब यांनी बाज ग्रामपंचायतला भेट देऊन अभियानाच्या तयारीची पाहणी केली. त्यांनी दिलेले मोलाचे मार्गदर्शन व सूचना ग्रामविकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत.

यावेळी सरपंच श्री. राज गडदे साहेब, ग्रामपंचायत अधिकारी व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकमुखाने ठाम ग्वाही दिली की, सर्व निकषांनुसार अभियानात प्रभावी सहभाग घेऊन गावाचा सर्वांगीण विकास साधू आणि समृद्ध पंचायत राज अभियानात बक्षिसास पात्र ठरू.

एकजुटीचा संकल्प, सक्षम नेतृत्व आणि लोकसहभाग यांच्या बळावर बाज गाव समृद्धीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे! 🚀✨

समृद्ध पंचायत – समृद्ध गाव – समृद्ध महाराष्ट्र!