बाज ग्रामपंचायत | मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत-लोकसहभागातून – एक दिवस गावासाठी : श्रमदान.

🧹 स्वच्छता,

🌳 वृक्षारोपण | जतन ,

♻️ पर्यावरण संवर्धन

सरपंच राज गडदे यांच्या नेतृत्वाखाली प्रेरणादायी लोकचळवळ

नववर्ष व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत बाज ग्रामपंचायत येथे

“लोकसहभागातून – एक दिवस गावासाठी” हा श्रमदानाधारित उपक्रम प्रभावीपणे सुरू असून गावभर सकारात्मक परिवर्तन घडताना दिसत आहे. या उपक्रमाची संकल्पना व पुढाकार सरपंच राज गडदे यांनी घेतला असून, नागरिकांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे.

दर शनिवारी सकाळी ८ वाजता ग्रामस्थ श्रमदानासाठी एकत्र येत

🧹 स्वच्छता,

🌳 वृक्षारोपण | जतन ,

♻️ पर्यावरण संवर्धन

अशी कामे करत आहेत. या अभियानात प्राथमिक व माध्यमिक शाळांचे शिक्षक व विद्यार्थीही सक्रियपणे सहभागी होत असून, नव्या पिढीत सामाजिक जबाबदारी, शिस्त आणि गावाविषयी आपुलकी निर्माण होत आहे.

अशी कामे करत आहेत. या अभियानात प्राथमिक व माध्यमिक शाळांचे शिक्षक व विद्यार्थीही सक्रियपणे सहभागी होत असून, नव्या पिढीत सामाजिक जबाबदारी, शिस्त आणि गावाविषयी आपुलकी निर्माण होत आहे.

या उपक्रमाला माजी सीआरपीएफ सब-इन्स्पेक्टर मा. दत्ता खरात,

माजी सैनिक व उपसरपंच गणपती ऐवळे ,

तसेच माजी सभापती आकाराम दादा मासाळ

यांचे मार्गदर्शन व सक्रिय पाठबळ लाभत आहे. त्यांच्या अनुभवामुळे या उपक्रमाला शिस्त, नियोजन व सातत्य मिळत आहे.

या श्रमदानामुळे गावाचा परिसर अधिक स्वच्छ, हिरवागार व सुसंस्कृत होत असून “गाव आपले – जबाबदारी आपली” ही भावना बळावत आहे.

गावाचा विकास हा केवळ योजनेतून नाही, तर आपल्या सहभागातून होतो.

आपण प्रत्येकाने आठवड्यातून फक्त एक दिवस गावासाठी दिला,

तर आपले गाव स्वच्छ, सुंदर आणि आदर्श बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

मी सर्व युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, शिक्षक व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की

दर शनिवारी सकाळी ८ वाजता श्रमदानात सहभागी व्हा.

हे काम ग्रामपंचायतीचे नाही,

हे आपले सर्वांचे सामूहिक कर्तव्य आहे.

चला, एकत्र येऊया…

श्रमदानातून विकास घडवूया

आणि बाज गावाला महाराष्ट्रासाठी आदर्श बनवूया.”*

📅 दर शनिवारी

⏰ सकाळी ८ वाजता

✨ श्रमदानातून विकास, लोकसहभागातून नेतृत्व — बाज ग्रामपंचायतची नवी ओळख.

#bajgrampanchayat#sarpanch#rajgadade#gramvikasvibhag#mukhyamantrisamrudhapanchayatrajabhiyan