लोकसहभागातून – एक दिवस गावासाठी : श्रमदान
लोकसहभागातून – एक दिवस गावासाठी : श्रमदान
previous arrow
next arrow

बाज ग्रामपंचायत मध्ये आपले स्वागत आहे.

गावातील माहिती, आवश्यक सेवा आणि अधिकृत अपडेट्ससाठी तुमचा विश्वासार्ह स्रोत. पारदर्शक प्रशासन आणि संसाधनांच्या सुलभ उपलब्धतेसह रहिवाशांना सक्षम बनवणे.

पदाधिकारी/अधिकारी

बाज ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व सदस्यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली, सर्व शासकीय विभागांच्या समन्वयाने प्रभावीपणे राबविला जात आहे.

Sarpanch Raj Gadade

श्री दशरथ (राज ) रामहरी गडदे

सरपंच | बाज

श्री गणपती कृष्ण ऐवळे

उपसरपंच | बाज

स्वाती म्हस्के

ग्रामपंचायत अधिकारी | बाज

अतुलनीय यशोगाथा

लोकसहभाग आणि एकोप्याच्या बळावर —
जलसंधारण, स्वच्छता व सामाजिक समतेतून
बाजचा विकास महाराष्ट्राला दिशादर्शक!




बाज आरोग्य उपकेंद्र – काम प्रगतीपथावर

बाज गाव व परिसरातील सर्व नागरिकांच्या आरोग्याची योग्य व वेळेवर काळजी घेण्यासाठी उभारले जाणारे नवे बाज आरोग्य उपकेंद्र आता अंतिम टप्प्यात आले आहे.
हे आरोग्य उपकेंद्र सुरू झाल्यानंतर—

  • गावातील लहान मुले, महिला, गर्भवती माता आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राथमिक उपचार, तपासणी व औषधोपचार गावातच मिळणार आहेत.
  • सामान्य आजारांसाठी दूर दवाखान्यात जाण्याची गरज राहणार नाही, त्यामुळे वेळ, पैसा आणि त्रासाची बचत होणार आहे.
  • आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत मिळणे हा या उपकेंद्राचा मोठा लाभ ठरणार आहे.

सरपंच राज गडदे यांचा संदेश:
“बाज गावातील प्रत्येक नागरिकाला वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, हाच आमचा मुख्य उद्देश आहे. नवे बाज आरोग्य उपकेंद्र अंतिम टप्प्यात असून, हे केंद्र सुरू झाल्यावर गावकऱ्यांना उपचारासाठी बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. ग्रामपंचायत नागरिकांच्या आरोग्यासाठी कायम कटिबद्ध आहे आणि हे उपकेंद्र लवकरच सर्वांच्या सेवेत आणण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत.”

हे उपकेंद्र म्हणजे केवळ एक इमारत नाही, तर बाज गावाच्या निरोगी, सक्षम आणि सुरक्षित भविष्यासाठी उचललेले ठोस पाऊल आहे.
ग्रामपंचायत बाज, गावकऱ्यांच्या सहकार्याने, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करत आहे.

🙏 चला, सर्वजण मिळून निरोगी, सक्षम आणि सुरक्षित बाज घडवूया!


जल जीवन मिशन – बाज गावासाठी पाणीपुरवठ्याचा नवा अध्याय

केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन – हर घर जल कार्यक्रमांतर्गत मौजे बाज, ता. जत येथे नळ पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेमुळे बाज गावातील वाडी-वस्तींसह प्रत्येक घरापर्यंत पिण्याच्या पाण्याचा नळ (Functional Household Tap Connection) पोहोचणार आहे.

या पाणीपुरवठा योजनेमुळे—

  • गावातील कोणतेही घर नळ पाणीपुरवठ्यापासून वंचित राहणार नाही,
  • महिलांना व ज्येष्ठांना पाण्यासाठी होणारा दैनंदिन त्रास कमी होईल,
  • शुद्ध व नियमित पाणीपुरवठ्यामुळे आरोग्य व जीवनमानात सुधारणा होईल.

उद्घाटन प्रसंगी उपस्थित लोकनियुक्त सरपंच राज गडदे यांनी सांगितले की, “बाज गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ आणि नियमित पिण्याचे पाणी मिळावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जल जीवन मिशनच्या माध्यमातून हा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे.”

ही योजना केवळ पाणीपुरवठ्यापुरती मर्यादित नसून, बाज गावाच्या शाश्वत विकासासाठीचा महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने ही योजना यशस्वीपणे पूर्ण करून लवकरच सर्व घरांमध्ये नळ पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

💧 स्वच्छ पाणी – निरोगी जीवन – समृद्ध बाज

सरपंच रहिवाशी दाखला

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड

जन्म प्रमाणपत्र

आवश्यक कागदपत्रे:

  • आई-वडिलांचे आधार कार्ड
  • रुग्णालयाचे प्रमाणपत्र
  • पत्ता पुरावा

मृत्यू प्रमाणपत्र

आवश्यक कागदपत्रे:

  • मृत व्यक्तीचे आधार कार्ड
  • डॉक्टरी प्रमाणपत्र
  • नातेवाईकाचा पुरावा

विवाह नोंदणी

आवश्यक कागदपत्रे:

  • वधू आणि वर यांच्या वयाचा दाखला (उदा . शाळा सोडल्याचा दाखला ,जन्म प्रमाणपत्र )
  • लग्नविधी प्रसंगीचा फोटो
  • लग्नाची पत्रिका,विवाह नोंदणी अर्जावर लग्न लावलेल्या पुरोहित व ३ साक्षीदार यांचे आधार कार्ड ,फोटो व स्वाक्षरी असणे आवश्यक

Don’t Miss

आगामी कार्यक्रम

Baj Updates

बाज गावातील नव्या घडामोडी

बाज ग्रामपंचायतीशी संपर्क साधा

गावातील नवीन अपडेट्सबद्दल माहिती मिळवा, महत्त्वाचे प्रमाणपत्र मिळवा किंवा सार्वजनिक सेवांमध्ये मदत मिळवा. बाज ग्रामपंचायत सर्व रहिवाशांना विश्वासार्ह माहिती आणि त्वरित सेवा देण्यासाठी येथे आहे.